बाळापूर पोलीस स्टेशनची पक्षी सेवा,

232

कडक तापमानात पक्षां साठी केली पाण्याची व्यवस्था

अकोला/ प्रतिनिधी

सध्या वैशाख वणवा पेटलेला असल्याने वातावरणात उष्ण आहे, त्या मध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे, अकोला जिल्हा हा उष्ण वातावरणा साठी प्रसिद्ध असल्याने पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या फिर्यादी तसेच इतर कामा साठी येणाऱ्या लोकांना थंड पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे, मानव आपली तहान कशीही भागवू शकतो, पाणी विकत घेऊन पिऊ शकतो परंतु पशु पक्षी अश्या उष्ण वातावरणात पाण्या अभावी काय करत असतील हा प्रश्न बाळापूर चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना पडला ,पोलीस स्टेशन हे इंग्रज कालीन असल्याने परिसरात बरीच मोठी झाडे आहेत, त्यावर बरेच पक्षी सकाळ संध्याकाळ गर्दी करून असतात, त्यांची उष्ण वातावरणात पाण्या अभावी कुचंबणा होऊ नये म्हणून प्रत्येक झाडाला एक मडके बांधून त्या मध्ये दररोज पाणी टाकल्या जाते, पक्षी त्या मधील पाणी पिऊन तृप्त होतात, पोलीस स्टेशन च्या धावपळीच्या कामात पोलिसांच्या ह्या संवेदनशील तेचे कौतुक होतांना दिसत आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।