चोरीच्या रेतीने शासकीय कालव्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला १५ हजारांचा दंड – तहसीलदार राजेंद्र इंगळे यांची कारवाई

0
597
Google search engine
Google search engine

टिटवा परिसरातील प्रकार

चांदूर रेल्वे  – (शहेजाद खान.) 

गेल्या अनेक दिवसांपासुन रेती घाट बंद असल्यामुळे बांधकामासाठी कन्हान रेतीचा आधार घेत असतांना चांदूर रेल्वे तालुक्यातील टिटवा येथे कालव्याच्या शासकीय कामावर मात्र वर्धा रेतीचा वापर खुलेआमपणे सुरू होता. सदर माहिती मिळताच तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी काम सुरू असल्याच्या ठिकाणी पाहणी करून चोरीची रेती असल्यामुळे  संबंधित कंत्राटदारावर १५ हजारांचा दंड ठोठावला आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगांव ते बग्गी, मांजरखेड (दानापुर) मार्गे टिटवा पर्यंत कालव्याच्या बांधकामाचे काम सुरू होते. परंतु काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू होते. रेती घाट बंद असतांना या शासकीय कामावर मात्र टिटवा परिसरात रेतीचे ढिगारे आढळत असुन यामध्ये मोठ्या प्रमाणात माती मिश्रीत होती. हीच चोरीची व बोगस रेती कालव्याच्या कामावर वापरत होते. सदर बाब काही दिवसांपुर्वी काही वृत्तपत्रांतुन झळकली होती. यानंतर तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी स्व:त कामाच्या ठिकाणी भेट देऊन चोरीच्या रेतीची पाहणी केली. यानंतर संबंधित कंत्राटदाराला १५ हजार ४३७ रूपयांचा दंड देण्यात आला. सदर दंडात्मक कारवाई तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केली. संबंधित कंत्राटदाराकडून हा दंड सुध्दा भरल्याची माहिती मिळाली आहे.