आज श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील ‘गुढीपाडवा यात्रा महोत्सवा‘चा समारोप – सव्वा वर्ष अखंड भजन मांड ची समाप्ती

0
1464
Google search engine
Google search engine

दुपारी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्रीकृष्णाजी उर्पâ अवधुत
महाराज यांची पावनभूमी श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा यात्रा महोत्सव गुढीपाडवा ते
रामनवमी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम करून उत्साहात साजरा करण्यात आला.या
महोत्सवात लाखो भाविकांनी अवधुत महाराजांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेतले.१६ एप्रिल
रोजी गुढीपाडवा महोत्सवाचा समारोप व सव्वा वर्ष अखंड भजन मांड ची समाप्ती होणार आहे.
त्यानंतर दुपारी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सकाळी ९ वाजता अध्यक्ष गोविंदराव राठोड, सचिव वामनराव रामटेके, विश्वस्त कृपासागर राऊत यांच्या हस्ते कळसाचे विधिवत पुजन करून
श्री अवधुत महाराज यांच्या मुख्य मंदिरावर बसविण्यात आले. तर त्याच दिवशी सायंकाळी
४ वाजता अमावस्या निमित्त ‘चंदनउटी‘ चा मान विश्वस्त कृपासागर राऊत यांनी मिळाला
त्यांनी विधीवत चंदनउटी केली.त्यानंतर गावातून रमना काढण्यात आला. ६ एप्रिल रोजी
सायंकाळी गुढीपाडवा निमित्त झेंडे चढविण्याचा नेत्रदीपक कार्यक्रम हभप चरणदास कांडलकर
यांनी झेंड्यांना पायाचा स्पर्श न करता देव व भक्ताचा ७० फुट उंच झेड्यांना नवीन खोळ
चढवली. ७ ते १२ एप्रिल दरम्यान दररोज दैनदिन धार्मिक कार्यक्रम घेण्यात
आले.रामनवमीला सायंकाळी ‘चंदनउटी’ करून गावातून रमना काढण्यात आले. बारा दिवस
चाललेला गुढीपाडवा यात्रा महोत्सवाचा समारोप १६ एप्रिल रोजी होणार असुन सकाळी ७
वाजता १८/१२/१७ ते १६/०४/१९ पर्यंत सव्वा वर्ष अखंड भजनाची मांड चालली.त्याची समाप्ती
होणार आहे. सकाळी ८ वाजता सव्वा वर्ष अखंड भजनाची मांड मध्ये सहभागी झालेल्या अवधुत
भजनी मंडळाची गावातून श्री ची पालखी व रमनासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार
आहे.सकाळी १०.३० ते १२ पर्यंत सव्वा वर्ष अखंड भजन मांड मध्ये सहभागी झालेले सर्व
ह.भ.प. अवधुत प्रचारक/प्रचारीका, अवधुत नाम प्रसारक, विशेष अतिथीगण व देवस्थान व
भजन मंडळ भाविकांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता भाविक-भक्तासाठी
महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविक भक्तानी घ्यावा असे आवाहन श्री विठोबा संस्थानचे
अध्यक्ष गोविंदराव राठोड, उपाध्यक्ष हरिदास सोनवाल, सचिव वामनराव रामटेके, विश्वस्त
कृपासागर राऊत, विनायक पाटील, दत्तुजी रामटेके, पुंजाराम नेमाडे, अनिल बेलसरे, दिगांबर
राठोड,रूपसिंग राठोड, स्वप्निल चौधरी यांच्यासह उत्सव समिती व गावकरी मंडळीने केले आहे.