श्री समृद्धी महिला पतसंस्थेकडून सेवानिवृत्त चव्हाण यांचा सत्कार
शेगाव :—स्थानिक श्री समृद्धी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शेगाव कडून नुकतेच आपला सेवा कार्यभाग पूर्ण करीत सेवानिवृत्त झालेले सुनील प्रभाकर चव्हाण यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला.
आरोग्य कॉलनीतील चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन दिनांक १जुलै सोमवारला संध्याकाळी ६ वाजता श्री समृद्धी महिला नागरिक पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त सुनील प्रभाकर चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी संस्थेचे व्यवस्थापक सुरेंद्र धनोकार यांनी त्यांच्या पुढील आयुष्य आरामदायक जावो अशा शुभेच्छा दिल्या सुनील प्रभाकर चव्हाण यांनी 1989 पासून ग. म. अभियांत्रिकी महाविद्यालय विद्युत विभागात सेवा सुरू केली व दिनांक 30 जून २४रोजी आपला सेवाकाळ पूर्ण करत सेवानिवृत्त झाले. वयाचे 32 वर्ष त्यांनी सेवा देत प्रामाणिक व कर्तव्य तत्पर राहत आपला कार्यकाळ पूर्ण केला ते संस्थेचे चांगले सभासद असून त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापक सुरेंद्र धनोकार ,कैलास दाभाडे, रोखपाल आशा मालोकार ,अंजली देशमाने ,सागर भोजने ,संग्रह संतोष कुकडे ,नाना पाटील ,उषा अग्रवाल, सुभाष मालोकार ,सुरेश तळपते, सुनील काठोळे व मोहम्मद आसिफ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.