लोकमान्य टिळक जातीपातीचे राजकारण न करता देशासाठी लढणारा नेता !!

304

लोकमान्य टिळक जातीपातीचे राजकारण न करता देशासाठी लढणारा नेता !!
प्राचार्य भूषण महाजन
शेगाव :- दि.२३ जुलै
इंग्रजांनी संपूर्ण भारतावर कब्जा करून भारत मातेला गुलाम करून टाकले असताना त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते अशा वेळेस बाळ गंगाधर टिळक यांनी संपूर्ण देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून त्यांचे संघटन करून इंग्रजांच्या विरुद्ध संघटितपणे लढा द्यायला सुरुवात केली होती त्यांनी कोणतेही जातीपातीचे राजकारण न करता फक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी चा लढा लोक सहभागातून उभा केला होता त्यामुळेच त्यांना लोकमान्य अशी पदवी लोकांनीच दिली होती.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती त्यानिमित्ताने शेगाव येथील लोकमान्य टिळक चौकात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून लोकमान्य टिळक यांच्या चाहत्यांनी व राष्ट्रप्रेमीनी त्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही लोकमान्य टिळकांची जयंती साजरी केली यावेळेस बोलताना माजी प्राचार्य भूषण महाजन यांनी लोकमान्यचा इतिहास व त्यांचे चरित्र व त्यांचे विचार यावर प्रकाश टाकला सध्याची भारताची स्थिती ही जातीपातीच्या राजकारणाकडे जात असल्याची धोक्याची सूचना असून हे सर्व मिटवून एकत्रितपणे देशाच्या सर्वोभोमत्वाच्या रक्षणासाठी प्रगतीसाठी व भारत मातेला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या विचारांची आज नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळेस कार्यक्रमाचे संचलन दत्ता भोंडेकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मोनू देशपांडे यांनी केले यावेळेस प्रमुख उपस्थितीमध्ये ब्राह्मण महासंघाचे नेते विजय जगधन ,दीपक शर्मा, नंदू भाऊ कुलकर्णी ,पवन महाराज शर्मा ,सागर आमले, राजकुमार व्यास , चिन्मय कुलकर्णी, रुद्र देशपांडे, रितेश चव्हाण, ज्ञानेश्वर दांगटे इत्यादी सह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व दिवसभर विविध संघटनांनी लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले.