अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- पाचव्या वर्गात प्रवेश दिल्याचा मोबदला म्हणून मुख्याध्यापकानेच मागितली लाच – अँटी करप्शन ब्युरो ची कारवाई

अमरावती / वरुड :-  तक्रारदार यांनी तक्रार दिली की तक्रारदारांची  एक मुलगी व मुलगा  असे दोन मुल आहेत दोन्ही मुले ऐन. टी रडके हायस्कूल वरुड येथे शाळा शिकत आहेत  मुलगी ही इयत्ता नवव्या वर्गात शिकत असून मुलाला चालू वर्षी पाचव्या  वर्गात प्रवेश मिळाला आहे  सदरची ऐन. टी रडके हायस्कूल वरुड शाळा शंभर टक्के अनुदानित आहे

ऐन. टी रडके हायस्कूल वरुड येथे मुलाचे बोनाफाईड काढण्यासाठी गेले असता मुख्याध्यापक श्री योगेश जयकुमार बरडिया यांनी सदरची शाळा शंभर टक्के अनुदानित असताना तक्रारकर्त्याचा मुलाला पाचव्या वर्गात प्रवेश दिल्याचा मोबदला म्हणून एक हजार रुपयाचा लाचेची  मागणी केली  व नियमबाह्य पणे परीक्षा फी ची मागणी करत होते या बाबत तक्रारकर्त्यांनी लाच लुचपत विभागाकडे  लेखी तक्रार केली  सदर तक्रारी नंतर पडताळणी कार्यवाही दरम्यान दिनांक 23/07/2024 ला पंचासमक्ष 1000 रुपये  स्वीकारले त्यामुळे  मुख्याध्यापक यांना ताब्यात घेऊन वरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात येत आहे