विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी एक दिवसीय धरणे आंदोलन…

73

विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी एक दिवसीय धरणे आंदोलन…

शेगाव:- लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून शासन प्रशासन चे कर्मचारी आपल्या विविध अशा मागण्या घेऊन शासनदरबारी जात आहे त्यातीलच एक संघटना म्हणजे विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांची संघटना मागील अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्या करता लढा देत असून आज त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शेगाव तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारलेले. या आंदोलनामध्ये शेगाव तथा तालुक्यातील संपूर्ण पटवारी आणि मंडळ अधिकारी यांची उपस्थिती दिसून आली शेगाव तहसील कार्यालयासमोर विविध नारे देत ही मंडळी उपस्थित होती.

या शिवाय जर का शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण राज्यभर आम्ही काम बंद आंदोलन उभारू अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली.