डॉक्टर गायकवाड यांचा मराठा समाज बांधवांकडून सत्कार…
शेगाव : — स्थानिक मुरारका महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डाॅ विनोद गायकवाड यांना रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशी एल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांच्या कडून भारत शिक्षण रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मराठा समाजाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
दिनांक 30 जुलै रोजी सकाळी बारा वाजता मराठा समाजाच्या वतीने डॉक्टर गायकवाड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी विजय यादव यांनी सरांबद्दल माहिती देताना सांगितले डॉ. विनोद गायकवाड हे मुरारका महाविद्यालय शेगांव येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून गेल्या २४ वर्षापासून कार्यरत आहेत. पीएच. डी. मार्गदर्शक असल्याने पीएच.डी. प्रबंधाचे मूल्यमापन करतात.सोबतच वृत्तपत्राचे स्तंभलेखक असून त्यांचे आतापर्यंत ४२५ च्यावर लेख प्रकाशित झालेले आहेत.तसेच त्यांच्या मतदार जागृती अभियानाची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. वृक्षमित्र असून सामाजिक कार्यातही उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याची माहिती विजय यादव यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नाना पाटील व आभार दिनेश साळुंके यांनी व्यक्त केले यावेळी अंबादास सुकाळे ,दीपक धमाळ, पत्रकार अनिल उंबरकर ,विजय यादव ,सचिन धमाळ ,अशोक डांबे,मिलिंद सोंडकर,दिनेश साळुंके,यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
डॉ. गायकवाड यांची कार्य समाजाकरिता भुशणावह :—-‘ सचिन धमाळ
प्राध्यापक डॉ. विनोद गायकवाड यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यांची काही पुस्तके अभ्यासक्रमात सुद्धा आली आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. ते राजकीय विश्लेषक म्हणून सुद्धा परीचित आहे. त्यांच्या या सर्व उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना नुकताच मिळालेला शिक्षण रत्न पुरस्कार हा मराठा समाजासाठी भूषणावह असुन आपण शैक्षणिक क्षेत्रासह समाजपयोगी क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. निश्चितच आम्हा सर्वांसाठी ती अभिमानाची बाब असल्याने पुरस्कार मिळाल्याने मनस्वी आनंद झाला.
असल्याचे मत सचिन धमाळ यांनी या सत्कार प्रसंगी व्यक्त केले)