रविवारी अहिल्या संदेश यात्रेचा शेगांव येथून प्रारंभ

77

रविवारी अहिल्या संदेश यात्रेचा शेगांव येथून प्रारंभ

शेगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे. त्यांचा संदेश ग्रामीण भागामध्ये ही पोहचावा या हेतुने महाराष्ट्र धनगर समाज महासंघ यांच्या वतीने अहिल्या संदेश यात्रेचा शुभारंभ श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावं मधून दिनांक 25 ऑगस्ट 2024 ला दुपारी 1 वाजता होणार आहे.

ही संदेश यात्रा जिल्हयातील शेगांव, संग्रामपुर, जळगांव जामोद, नांदुरा व खामगांव तालुक्यामध्ये जावून दि. 29 ऑगस्ट 2024 ला खामगांव तालुक्यात समारोप होणार आहे. रथप्रमुख म्हणून रविंद्र गुरव त्यांचे सहप्रमुख अशोक करे व चंद्रकांत कळंबे हे राहणार आहेत.

महसंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे, महासंघाचे उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार, अहिल्या महिला महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. अलकाताई गोडे आदींची सोबत उपस्थिती राहणार आहे. सर्व जनतेने या संदेश यात्रेचे भव्य स्वागत करावे असे आवाहन मल्हार सेनेचे सर सेनापती अशोक देवकाते व जिल्हाध्यक्ष मनोहर पाचपोर यांनी केले आहे.