आरपीएफ रंजन तेलंग यांच्या प्रयत्नाने मीसिंग युवती पोलीस व परिवाराच्या ताब्यात

40

आरपीएफ रंजन तेलंग यांच्या प्रयत्नाने मीसिंग युवती पोलीस व परिवाराच्या ताब्यात

शेगाव:- दिनांक 31 ऑगस्ट रोजी भातकुली जिल्हा अमरावती येथून एक युवती गायब होण्याची मीसिंग वळगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली 11 दिवस या तरुण युवतीचा शोध सुरू होता दिनांक 11 सप्टेंबर रोजी एक युवती संदिग्ध परिस्थिती मध्ये शेगाव रेल्वे स्टेशन च्या बुकिंग परिसरात असून काही युवक तिथे घिरट्या घालत असण्याची माहिती शेगाव चे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना मिळाली त्यांनी लगेच तिथे जाऊन त्या मुलीला चौकशी केली असता तिने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने तेलंग यांनी तिला आरपीएफ ठाण्यात घेऊन गेले तिथे उप निरीक्षक डॉ विजय साळवे यांना सदर हकीकत सांगितले वरून चौकशी दरम्यान ती युवती घरून निघून गेल्याचे समजले नंतर तिच्या परिवारा सोबत बोलणे केल्यावर तिची मीसिंग वळगाव पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे कळल्याने तिथे सूचित करण्यात आले त्यांनतर पोलीस व युवतीच्या परिवाराने शेगाव गाठले डॉ विजय साळवे यांनी विधिवत कार्यवाही करून मुलीला सुपूर्द केले, मुलीच्या शोधासाठी परेशान असलेल्या तिच्या परिवाराने प्रधान आरक्षक रंजन तेलंग व आरपीएफ विभागाचे विशेष आभार मानले