शिवशंभो गणेशोत्सवा मंडळाच्या महाआरतीने काशी तील गंगा आरतीचा अनुभव आला- आ.डाॅ. संजय कुटे .
शेगाव :- शिस्तबद्ध ताल सुरातील महाआरतीने भक्तीची ऊर्जा तयार होऊन दिवसभरातील थकवा नाहीसा होतो, शिवशंभो मित्र मंडळ द्वारा आयोजित महाआरतीने जणू आपण काशी विश्वनाथ येथील गंगा आरतीचा अनुभव आल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. संजय कुटे यांनी शेगाव येथे केले.येथील शिवशंभो गणेशोत्सव व मित्र मंडळाद्वारा महाआरती व स्वर्गरथ लोकार्पण प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी खामगाव मतदार संघांचे आमदार आकाशदादा फुंडकर, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम शेगोकार, पांडुरंग बूच, विश्वहिंदू परिषदेचे मंदिर अर्चक पुजारी सहप्रांतप्रमुख प्रशांत जोशी, भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सचिन ढमाळ,न.प. मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर, शहर पो.स्टे.चे ठाणेदार नितीन पाटील, शंभू फायबर आर्ट चे संचालक अनुप पोहेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
पुढे स्वर्ग रथावर बोलताना सर्वोत्कृष्ठ कर्मातुनच मोक्षाचा मार्ग साध्य होतो त्या करिता माणसाने मिळालेल्या जीवनात सर्वोत्कृष्ठ कर्म केले तरच त्याचा योग्य मोक्षाचा मार्ग साध्य होतो स्वर्ग सुखाची प्राप्ती होते.
स्व. रामभाऊ पोहेकर यांच्या स्मृर्तीपित्यर्थ अनुप पोहेकर यांनी स्वर्गरथ शिवशंभो मंडळास भेट दिला. हे समाज उपयोगी महान कार्य केल्याचे गौरवोद्गारही यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी काढले
सर्वांसाठी स्वर्गरथा चा वापर निशुल्क राहील;– पवन महाराज शर्मा
सदरचा स्वर्ग रथ श्री शिवशंभो मित्र मंडळ कडे अनुप पोहेकर यांनी ज्या विश्वासानी दिला तो विश्वासाला तडा न जाऊ देता ही सेवा विनामूल्य अखंडित चालवणार असून जनतेच्या सेवेत सदरचा स्वर्गरथ सुरु झाला असून सर्वांसाठी हा रथ निशुल्क राहील अशी घोषणा मंडळाचे संस्थापक पवन महाराज शर्मा यांनी यावेळी केले. तसेच ते म्हणाले समाज हिताचे कार्य आणि सातत्याने मंडळाच्या वतीने कायम ठेवू यंदाच्या गणराया पुरस्कारातून माघार घेत असून इतरांना संधी मिळावी हा उदात्त भाव आमच्या मंडळांनी ठेवला असल्याचे पवन महाराज शर्मा यांनी सांगितले.
याप्रसंगी श्रीगणेशाची महाआरती करण्यात आली मंडळातील पदाधिकाऱ्यांचा उत्साह पाहून उपस्थित भारावून गेले होते. परिसरातील महिलांनी दिव्याची आरास लावून कार्यक्रमांची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे संचलन पत्रकार नाना पाटील तर आभार पवन महाराज शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष बोलावण्यात आले होते. याप्रसंगी पंचक्रोशीतील भक्तांनी एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमाला कमलाकर चव्हाण, राजेश अग्रवाल ,विजय यादव ,संदीप काळे ,प्रमोद काठोळे, विजय राठी, , भैया सूळ, मुन्ना कचरे,शिवशंभो मंडळाचे अध्यक्ष गजानन काकपुरे,हरीश झाडोलिया गोपाल गोहेल, अमित गोहेल, स्वप्नील मिश्रा यांच्यासह शेकडो शिवशंभो मंडळाचे कार्यकर्ते सह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार डॉ. कुटे व पवन शर्मा यांचा सत्कार
नुकताच आमदार डॉक्टर संजय कुटे यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते मिळालेला उत्कृष्ट संसद पटू हा पुरस्कार बद्दल शिवशंभो मंडळासह शेगाव शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य महासत्कार करण्यात आला व त्यानंतर स्वर्ग रथाच्या उपक्रमा करिता आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी माजी नगरसेवक पवन महाराज शर्मा यांचा सुद्धा सत्कार या कार्यक्रमात केला हे विशेष
स्वर्ग रथ भेट देणारे अनुप पोहेकर यांचा सत्कार करताना आमदार डॉक्टर संजय कुटे सोबत मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर ,ठाणेदार नितीन पाटील, पांडुरंग बुच,पवन महाराज शर्मा यांच्यासह इतर मान्यवर