गणराया व आई भवानी पुरस्कार करिता
शेगाव:— स्थानिक संत नगरीच्या सौंदर्यात भर टाकणारी व शेगावला हिरवळ करणारी एकमेव संस्था गो ग्रीन फाउंडेशन कडून वृक्ष संगोपना सोबतच इतरांच्या चांगल्या समाज उपयोगी विचारांचा व कार्याचे संगोपन करीत असते.
मागील वर्षीपासून मोतीबाग प्रसारक मंडळ व नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष किरणबाप्पु देशमुख यांनी आपलं गाव आपली जबाबदारी या माध्यमातून गणराया पुरस्कार व आई भवानी पुरस्कार जाहीर करून मंडळाना अनेक उपक्रम देत सहभागी होण्यास भाग पाडले आपलं गाव आपली जबाबदारीची जाणीव करीत उत्सव हा शिस्त, संस्कार व संस्कृतीमय व्हावे हा उद्देश ठेवत गाव सहभागातून गणराया पुरस्कार व आई भवानी पुरस्कार सुरू केल्याबद्दल किरणबाप्पु देशमुख यांचा गो ग्रीन फाउंडेशन कडून गो ग्रीन सत्कार करण्यात आला हे विशे
किरण बाप्पू यांनी सुरू केलेला हा पुरस्कार आवर्जून त्यांनाच दिला जातो जे मंडळ उत्सव काळात डीजे व लेझर लाईटचा वापर करीत नाही. आणि पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना यात सहभागी केल्या जाते त्यामुळे काही अंशी तरी जुन्या काळापासून सुरू झालेला या उत्सवाचे उद्देश जोपासल्या जाईल व संस्कृतीचे जतन आणि पर्यावरणाचे रक्षण होऊन तरुणांमध्ये उत्सव काळात वाढत असलेली व्यसनाधीन वृत्तीला आळा बसू शकतो कारण आजच्या तरुणांना कोणी च मार्गदर्शक राहिलेला नाही नेमका उत्सव कसा व का ?साजरा करावा हे मार्गदर्शन करणारे फार कमी आहेत हे कार्य करणारे किरण बाप्पू देशमुख यांच्या सुधारवादी ,पुरोग्रामी, समाज सुधारक ,सकारात्मक ,प्रेरणादायी विचारांचा आणि कार्यांचा हा गौरव असल्याची प्रतिक्रिया गो ग्रीन फाउंडेशनने यावेळी व्यक्त केली.