*सेमाडोह अपघात अपडेट ;४ प्रवाशांचा मृत्यू,७ प्रवासी गंभीर जखमी*
अमरावती रेफर करण्यात आलेले पेशंट
प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह येथील यादी
अमरावती / सेमाडोह :-
आज सकाळी खासगी प्रवासी बस पुलावरुन नदीत कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना मेळघाटातील सोमाडोह परिसरात धारणीजवळ घडली. या बसमधील अनेक प्रवाशांना मोठी दुखापत झाल्यानं घटनास्थळी स्थानिक नागरिक ,पोलीस पथकाने बचावकार्य करीत जखमी प्रवाश्यांना बाहेर काढले मात्र या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ जखमी प्रवाशांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यापैकी ७ प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय ( इर्विन) येथे उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे व उर्वरित १८ प्रवाशांच्या इलाज अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सुरु आहे.