महासचिवांच्या वाढदिवसाचा पडला विसर
शेगाव :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी मंत्री खासदार मुकुलजी वासनिक यांचा वाढदिवस काही दिवसा अगोदरच संपन्न झाला. एकेकाळी काँग्रेसमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले माननीय मुकुलजी वासनिक सोबत काँग्रेस कार्यकर्त्यांचा पूर होता पण आज रोजी जगप्रसिद्ध असलेली संत नगरीमध्ये माननीय मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त मोजकेच बॅनर शहरांमध्ये लागलेले दिसून आले तेही फक्त महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव रामविजयजी बुरुंगले यांच्या मार्फतच होती.
आता प्रश्न असा पडतो की एकेकाडी संपूर्ण कार्यकर्त्यांनी भरलेली काँग्रेस का बरं खाली झाली असावी काय मुकुलजी वासनिक यांची प्रसिद्धी कमी झाली असावी संत नगरीतील इतर नेत्यांना मुकुलजी वासनिकांचे वर्चस्व पसंत नाही? की काँग्रेसमध्ये अधिकाधिक गटबाजी वाढत आहे जर का असं असेल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सर्व बाबींचा फटका काँग्रेस पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही असे चित्र आज तरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वत्र दिसून येत आहे.