शेगांवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

181

शेगांवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

 

शेगाव (प्रतिनिधी):- शेगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाल व शिशु चा विजयादशमी उत्सव दि. १३ ऑक्टोंबर रोजी चंद्रलोक सोसायटीच्या श्रीगणेश मंदिर येथे संपन्न झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा उत्सवांपैकी एक उत्सव म्हणजे विजयादशमी उत्सव काल संध्याकाळी सहा वाजता शेगाव शहरातील चंद्रलोक सोसायटीच्या श्रीगणेश मंदिर येथील मैदानावर संपन्न झाला. त्यावेळी नगर संघ चालक श्याम तेल्हारकर, प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले विद्यालय शेगावचे मुख्याध्यापक अमोल चिंचोलकार, तसेच प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख, आकाश निलजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजयादशमीच्या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व शस्त्र पूजनाने झाली त्यावेळी बाल स्वयंसेवकांनी संघ शाखेत शिकवल्या जाणाऱ्या बाबींचे प्रात्यक्षिक मान्यवरांना करून दाखविल्या त्यामध्ये प्राचीन युद्ध कला नियुद्ध, व्यायाम योग, घोष व मनोऱ्याचे प्रात्यक्षिक केले. शिशु व बालांनी केलेले हे प्रात्यक्षिक शिस्त व एटीत असल्याने उपस्थितांची मने रोमहर्षक झाली. सांघिक गीत, गोपाल जाधव, अमृत वचन, ईशान आढाव, यांनी तर वैयक्तिक गीत गणेश वणे तसेच सुभाषित गितांशा उमाळे या बालस्वयंसेवकांनी सादर केले.
नंतर प्रमुख अतिथी म्हणून असलेले मुख्याध्यापक, अमोल चिंचोळकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यानंतर आकाश निलजे यांनी संघामध्ये विजयादशमीच्या उत्सवाचे महत्त्व सांगितले आणि संघ शाखेमध्ये कशाप्रकारे लहान बाल मनावर सुसंस्कार होतात याची माहिती दिली. प्रास्ताविक सहकार्यवाह योगेश कडू यांनी तर नगर कार्यवाह आशिष पांडे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य शिक्षक कृष्णा भगत व इतर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.