- पिंपळ पानावरती …..!
- सांगली/कडेगांव न्युज:
- इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्व तरावे. …या ओळी आठवतात? मंगेश पाडगांवकरांच्या ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या भावगितातील या ओळी आहेत. या ओळी शब्दश:नाही पण किमान जगभरातील लोकप्रिय व्यक्तीची चित्रे जाळीदार पिंपळ पानावर हळुवार कुंचल्याने साकारणारा एक कलाकार शरद ठेंगे हा कडेगांव च्या मातीतच आपल्या कलेचे धडे गिरवत असुन त्याच्या कलेचा हा लेखाजोखा.!
- चित्रकार शरद ठेंगे
- शरदचे प्राथमिक शिक्षण हे महात्मा गांधी विद्यालय कडेगांव येथे झाल्यानंतर सांगलीतील कलामंदीर महाविद्यालयात त्यांनी कलेचे धडे घेतले व आर्ट मास्टर पदवी घेतली शरद यांनी अप्रतिम अशी काष्टशिल्पे तयार केली आहेत. शरद ठेंगे यांनी आपली कला जिवंत ठेवत स्वतंत्र चित्रकार ही जिवंत ठेवला आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रात स्वत:चा ठसा निर्माण केला आहे.कलेची ज्ञानगंगा ग्रामिण भागातील सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवण्याचे काम शरद ठेंगे करित आहे.
पिंपळाच्या जाळीदार पानावर रेखाटलेली व्यक्तीचित्रे हे त्यांच्या कलेचे अप्रतिम प्रमुख वैशिष्ट्य!
यामध्ये मदर तेरेसा, लता मंगेशकर, गौतम बुध्द, राधाकृष्ण, छ.शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीचित्रणातील टिपलेले सुक्ष्म बारकावे पाहणाऱ्यांच्या मनाला भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. या शिवाय विविध आकर्षक निसर्गचित्रेही ते रेखाटतात.
माजी मंत्री शिवाजीराव देशमुख.
माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम
- राज्यातील अनेक मान्यवरांची तैलचित्रे त्यांनी साकरली आहेत त्यात प्रामुख्याने माजी मंत्री डॉ पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, विलास काका उंडाळकर युवा नेते संग्रामसिंह देशमुख इत्यादींचा समावेश आहे. त्यांची जहॉंगिर आर्ट मुंबई येथे व रंग आर्ट दिल्ली येथिल प्रदर्शनातही तैलचित्रे लावण्यात आली होती. या शिवाय विविध आकर्षक निसर्ग चित्रेही ते रेखाटतात.शरद ठेंगे यांचेकडे बाबुराव पेंटर, आबालाल रेहमान,पंत जांभळीकर, राजा रविवर्मा, मायकेल एंजिलो अशा हिंदुस्थानी व पाश्चिमात्य देशातील सव्वादोनशे दिग्गज चित्रकारांची कात्रणे त्यांच्या संग्रही आहेत. खरे तर कडेगांव सारख्या खेड्यातून शरद ठेंगे यांनी केवळ तैलचित्रावर व केन्व्हासवर रंगाचा खेळ न करता निसर्गाच्या कलेसाठी वापर करीत निसर्गाच्या सानिध्यात स्वतःची रंगसंगती खुलवली आहे.बऱ्याच हिंदी चित्रपट सृष्टीतील सिनेमात त्यांच्या सुबक पेंटिग चा समावेश आहे १९९८ साली त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला आहे.मग अशा कलाकाराला मनापासुन कलारसिकांनी दाद द्यायलाच हवी ना……..!