श्री.विजय रमेश नारखेडे यांना महात्मा ज्योतिराव फुले 2024 राज्यस्तरीय शिक्षण पुरस्कार जाहीर…
जालना येथे डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदेद्वारा दरवर्षी देण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय शिक्षण पुरस्कार वितरित करण्यात आले. राज्यभरातून राष्ट्रीय स्तरावरच्या निवड समितीने विभागावर अभ्यास करून पुरस्कारासाठी सदरील शिक्षकांची छाननी केल्यानंतर निवड समितीने अधिकृत घोषणा केली याविषया माहिती देताना डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी मान्यवराच्या हस्ते वितरण जालना येथील भाग्यनगर मराठा सेवा संघाच्या कार्यालयातील स्थित मा.खा. भाऊसाहेब देशमुख सभागृहात देण्यात येथील यावेळी कार्यक्रमाला विभागाच्या समाजसेवक, राष्ट्रीय शिक्षण, असे अनेक प्रमुखांची उपस्थिती होती.
शिक्षण,कला, क्रीडा व साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील खालील मान्यवर शिक्षकांचे डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय शिक्षण पुरस्कार 2024 साठी निवड करण्यात आलेली यामध्ये कृष्णाजी रामजी पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ता. खामगाव येथील शेगाव संत नगरीचे रहिवासी ज्येष्ठ शिक्षक श्री विजय रमेश नारखेडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सपत्नी पुरस्कार देण्यात आला या पुरस्कार वितरण वेळी मा. श्री विजय नारखेडे सर व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ.छाया नारखडे यांना गौरव पत्रक, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर, कर्मचारी वृंद, परिवारातील सदस्य व मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिमानास्पद आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.