विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
उमेदवारांना 100 रु च्या जागी आता 500 रु च्या स्टँप लागणार
अचलपूर :- विधानसभा निवडणुकीच्या कुरूक्षेत्रात उतरण्यासाठी म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसीलनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आज फॉर्म द्यायला सुरवात झाल्या बरोबर चांदुर बाजार येथील श्री शशिकांत नानासाहेब निचत यांनी स्वतःसाठी पहिला फॉर्म घेतलेला आहे ते अपक्ष उमेदवार म्हणून त्याचा अर्ज दिनांक 29 ऑक्टोम्बर रोजी दाखल करणार आहे असे त्यांनी सांगितले
१०० रुपयांना उमेदवारी अर्ज…
राखीव प्रवर्गासाठी ५ हजार तर खुल्या प्रवर्गासाठी १० हजार रुपये सुरक्षा अनामत ठेव रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहे. निवडणूक कार्यालयातून १०० रुपये भरून उमेदवारी अर्ज घ्यावा लागेल. नामांकन पत्र भरताना सोबत अनामत रक्कम भरावी लागेल.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम
२२ ऑक्टोबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी
२९ ऑक्टोबरला उमेदवारी भरण्याची अंतिम मुदत.
३० ऑक्टोबर उमेदवार अर्जांची छाननी.
४ नोव्हेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत.
२० नोव्हेंबरला मतदान होईल.
२३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
२५ नोव्हेंबरला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.