संग्रामसिंह देशमुख यांनी भाजपा महायुती कडुन दाखल केला उमेदवारी अर्ज
सांगली न्युज:
कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघत महायुती कडुन माजी जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी भाजपा महायुती कडुन आज गुरूवार (दि .२४)गुरू पुष्यामृत योग मुहुर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सतीश भाऊ देशमुख, चंद्रसेन देशमुख,जयदिप देशमुख, दत्तात्रय सुर्यवंशी
नगराध्यक्ष धनंजय देशमुख, शिवाजीराव मगर पाटील,उपनगराध्यक्ष अमोल डांगे आदीसह कार्यकर्ता उपस्थित होते.
माजी जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता निवडक नेत्यां सोबत साध्या पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी रणजीत भोसले यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले स्व.संपराव देशमुख यांच्या विचारांचा वसा व वारसा घेऊन प्रथमच निवडणुक लढवत आहे.या मतदार संघात शेकडो कोटींची विकासकामे जिल्हा परिषद माध्यमातून मार्गे लावली आहेत याच बरोबर टेंभू, ताकारी योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून
विस्तारीत कामांना गती दिली आहे येणार्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर या योजनांचे पाणी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.हि निवडणुकीत विकास कामावर लढवत असुन माझा विजय नक्की आहे.
महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन हि निवडणूक लढत असल्याचे संग्रामसिंह देशमुख यांनी शेवटी बोलताना सांगितले.