पशुप्रेमी पिता पुत्रांनी वाचविले सहा घावट घुबडांची प्राण

40

पशुप्रेमी पिता पुत्रांनी वाचविले सहा घावट घुबडांची प्राण

शेगाव:- पाच दिवस अगोदर शेगाव मध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचे लहरी बरसल्या होत्या या वाऱ्यामध्ये संत गजानन महाराज वाटिका जवळ एका वृक्षावर घावट घुबडांचं त्यांच्या नवजात पिलांसह अस्तित्व होतं परंतु या वाऱ्याउदांमध्ये त्यांचं घरटं पळून निस्तनाबूत झालं आणि घुबडांचे जोडपे ऊडून गेले मात्र त्यांची सहा पिले न उडता आल्यामुळे तेथेच राहिली ही बाब पशुप्रेमी दिलीप माने आणि त्यांचे पुत्र हायकोर्टचे एडवोकेट प्रथमेश माने यांना कडताच त्यांनी तेथे जाऊन या पिलांना आपल्या घरी आणले त्यांचे संगोपन केले त्यांचा दवाखाना केला आणि वन विभागाला कळवले शासनाच्या नियमानुसार सर्व बाबी करत आज या घावट घुबडांच्या पिलांचे वनरक्षकांच्या हवाले ( सुपूर्त ) करण्यात आले. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की अशा अनेक छोट्या मोठ्या जीवांना त्यांनी वाचवले व त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले यामध्ये सर्वात जास्त साप या या जातीला त्यांनी जीवदान देत सुरक्षित ठिकाणी सोडले आहेत ही आवड त्यांना मागील कित्येक वर्षापासून जोपासत आहे एक संदेश देत त्यांनी अशा वन्य प्राण्यांना घाबरून न जाता संयमानी त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावे व त्यांना जीवदान देत पर्यावरणाचे रक्षण करावे.