विश्वजीत कदम उद्या शक्तीप्रदर्शनाने अर्ज भरणार.
शांताराम कदम.
“कडेगांव येथे सुरेशबाबा चौकात होणार जाहीर सभा.
़
सांगली/कडेगांव न्युज
दीपावलीच्या “वसुबारस” मुहूर्तावर महाविकास आघाडी कडून भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ.विश्वजीत कदम २८५ पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी कडेगांव प्रांत कार्यालयात उद्या दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी अर्ज भरणार आहेत, त्यानंतर कडेगाव येथील मोहरम चौक या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. विरोधकांना धडकी भरेल एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सागरेश्वर सह.सूतगिरणीचे चेअरमन शांताराम बापू कदम यांनी केले.
ते कडेगाव येथे कार्यकर्त्यांच्या संपर्क दौऱ्यावेळी बोलत होते. यावेळी भारती बँकेचे संचालक डॉ. जितेश कदम, दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम,तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, डॉ. पतंगराव कदम सोनहीरा कारखान्याचे व्हा.चेअरमन दीपक भोसले, जेष्ठ नेते सुरेश निर्मळ, माजी सरपंच विजय शिंदे,माजी उपनगराध्यक्ष साजिद पाटील प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलतांना शांताराम कदम म्हणाले की पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने कायापालट हा स्व. पतंगराव कदम व माजी आमदार मोहनराव कदम यांनी केलेला असून गेल्या पाच वर्षात मोठ मोठीं विकास कामे माजी राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी मंजूर करून मतदारसंघाच्या विकासात भर घातली आहे. मतदारसंघाच्या विकासाची मालिका आपणास अखंड ठेवायची आहे. त्यासाठी पुन्हा डॉ. विश्वजीत कदम आमदार हवेत निवडणुकीच्या तोंडावर विरोधक जनतेची फसगत करून पाहत आहेत त्याला पलूस-कडेगावचे सुज्ञ मतदार थारा देणार नाहीत यावर विश्वास असल्याचे शांताराम कदम यांनी सांगितले.
यावेळी यावेळी स्थानिक नेते मंडळी विविध पदाधिकारी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.