भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा गावागावात जनसंपर्कावर भर

  • भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा गावागावात जनसंपर्कावर भ

 

 

सांगली/कडेगाव न्युज:
निवडणुक विषेश:

कडेगाव पलुस तालुक्यात भाजपाचे उमेदवार जि.प.माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी गावागावात वाड्यावस्त्यावरती जाऊन जनसंपर्कावरती भर दिला आहे
महायुती सरकारच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची पोहचपावती मिळणार असल्याची भुमिका संग्रामसिंह देशमुख मांडत आहेत लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल प्रधानमंत्री जनधन योजना असेल नमो शेतकरी योजना असेल प्रधानमंत्री किसान योजना असेल अशा योजनांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता थेट लाभार्थी पर्यंत पोहचण्याची भुमिका घेतली आहे तसेच इतर घटकासाठी घरकुल आवास योजना असेल शहरी ग्रामीण भागातील लोकांसाठी रमाई घरकुल योजना असेल या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने काम केले आहे त्यामाध्यमातून दिन दलित वंचित उपेक्षित या घटकासाठी सुद्धा महायुती सरकारने काम केले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीचेच सरकार सत्तेत येणार असून या केलेल्या कामाचीच पोहचपावती मिळणार असल्याची भुमिका संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केली
त्यामुळे पलुस कडेगाव मध्ये येणाऱ्या काळात महायुतीच्या व भारतीय जनता पक्षाच्या विचार पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची गरज असुन यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे कडेगाव पलुस मतदार संघातील जनतेने उभे राहण्याची गरज आहे येणारा काळ भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा मा.आ.संपतरावजी देशमुख अण्णा यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या काळात त्यामुळे स्व.संपतरावजी देशमुख अण्णा यांनी बघीतलेला स्वाभिमानी तालुके निर्माण करण्याचे स्वप्न साकार करणार असुन येणाऱ्या काळात विरोधकांना जनता धडा शिकवुन स्वाभिमानी वृत्तीने मतदार बाहेर येऊन स्वाभिमानी मतदार संघ पलुस कडेगाव करतील अशी आशा संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केली