सांगली/कडेगाव न्युज :
पलूस कडेगाव मतदार संघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे प्रचार दौऱ्या दरम्यान लाडक्या बहिणी औक्षण करत, हातामध्ये राख्या बांधत ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करत आहेत. आपण संग्रामभाऊंच्या पाठीशी असून २३ नोव्हेंबरला गुलाल उधळून विजयोत्सवाची भाऊबीज साजरी करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
प्रचारादरम्यान संग्रामसिंह देशमुख लाडकी योजनेची वस्तुस्थिती सांगत आहेत. ज्या माऊलीने पोटाला चिमटा घेऊन प्रपंच उभा केला. कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःचं दुखून सांगितले नाही. शेतीचा एक गुंठा जमीन विकू दिली नाही. अशा त्यागी माय माऊलींच्या ऋणातून उतराई होण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना काढली. बहिणीच्या खात्यात थेट रक्कम जमा झाली. बहिणी सुखावल्या. त्यांना आनंद झाला. पण विरोधकांना बहिणींच हे सुख बघवत नाही. ही योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तसेच निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली. दिवाळीची भाऊबीज पाच हजार रुपये सरकारमार्फत लाडक्या बहिणींना मिळणार होती परंतु विरोधकांच्या कारस्थानामुळे मिळू शकली नाही. हे नुकसान करण्याचे पाप काँग्रेसने व त्यांच्या मित्र पक्षांनी केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी अशा लोकांना विधानसभेच्या निवडणुकीत धडा शिकविला पाहिजे असे आवाहन असे आवाहन संग्रामसिंह देशमुख यांनी केले.
जाईल तिथे गावोगावी संग्रामसिंह देशमुख यांचे लाडक्या बहिणी औक्षण करून, राख्या बांधून, पेढे भरवून स्वागत करत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांना गराडा घालून त्यांचे कौतुक करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ही योजना राबवल्याबद्दल त्यांना या लाडक्या बहिणी धन्यवाद देत आहेत.
महायुती सरकारने लाडक्या बहिणींना देताना कसलाही विचार केला नाही. बहिणीच्या सुखासाठी सरकारने ठोस निर्णय घेतला अशा सरकारला निवडून देणे ही आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे संग्रामभाऊ तुमच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत आणि तुम्हालाच आम्ही निवडून आणणार आहोत. खऱ्या अर्थाने भाऊबीज आपण 23 नोव्हेंबरला तुमच्या विजयाचा गुलाल उधळूनच साजरी करूया असा निर्धार लाडक्या बहिणी संग्रामसिंह देशमुख यांच्या समोर करत आहेत.
Home Uncategorized लाडक्या बहीणींचा संग्रामभाऊंच्या विजयोत्सवाची भाऊबीज साजरी करण्याचा निर्धार प्रचार दौऱ्यात औक्षण,राख्या...