मोझरी/तिवसा :-
देशातील हिंदुत्वाचा बुलंद आवाज आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ उत्तर प्रदेश लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या जाहीर सभेचे आयोजन गुरुकुंज मोझरी येथे करण्यात आले आहे.
आज बुधवार 6 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी एक वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी मंदिरा लगतच्या प्रांगणात भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे तिवसा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश वानखडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ योगी आदित्यनाथजी यांची तोफ धडाडणार आहे.
गुरुदेव समाधी मंदिरा लगतच्या प्रांगणात योगी आदित्यनाथजी यांच्या सभेसाठी भव्य सभा मंडप उभारण्यात आला असून सभेची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. प्रामुख्याने भारतातील युवा पिढीमध्ये योगी आदित्यनाथ जी यांचे विशेष आकर्षण आहे. देशविरोधी समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी बुलडोझर चालवून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देणाऱ्या योगी आदित्यनाथजी यांचे समाजात मोठे आकर्षण आहे.
या सभेला अमरावती जिल्ह्यातील नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा अध्यक्ष खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह महायुतीने केले आहे.