महाविकास आघाडी महायुती उमेदवारांमध्ये सुरुवातीपासून रस्सीखेच
जळगाव जामोद मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार भाजपचे डॉ. संजय कुटे आणि महाविकास आघाडी कडून मतदान रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्यामध्ये प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
सर्वात अगोदर महायुतीकडून उमेदवार असलेले डॉक्टर संजय कुटे यांनी अर्ज दाखल करण्याच्या दिनी केंद्रीय मंत्री भूपेश बघेल व मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला होता तर महाविकास आघाडी कडून डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला होता.
अर्ज दाखल करतान्यात डॉक्टर संजय कुटे यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व मंत्री भूपेश बघेल यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली होती तर आता दुसरीकडे महाविकास आघाडी कडून उमेदवार डॉक्टर स्वाती वाकेकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः करणार असल्याचे सांगितले जात आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा ७ तारखेला शेगावत असल्याने शेगावातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करणार आहे तर त्याच वेळी महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन स्वतः डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अर्ज दाखल करण्यापासून ते प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना पर्यंतच्या शर्यतीत दोन्हीही उमेदवार आपले कस पनाला लावताना दिसत आहेत. म्हणून जळगाव जामोद मतदार संघाची ही लढत नक्कीच उत्सुकतेची होणार आहे.