मुद्द्यांच्या आधारे जनतेसमोर जाऊ आणि निवडणूक लढवू- महाविकास आघाडी

42
Oplus_131072

मुद्द्यांच्या आधारे जनतेसमोर जाऊ आणि निवडणूक लढवू- महाविकास आघाडी

शेगाव:- महाविकास आघाडीचे शेगाव मध्ये असलेल्या काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन उद्या सकाळी शिवसेनाप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या अनुषंगाने आणि शेगाव शहरातील महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या शहराध्यक्ष सोबत चर्चा केली असता त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण देशमुख, राष्ट्रवादीचे दिनेश साळुंखे तसेच शिवसेना (उबाठा) योगेश पल्हाडे यांची उपस्थित होती. काय नियोजन आहे असा प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आमच्या प्रचाराला सुरुवात केली असून आमचे उमेदवार निवडूनच नव्हे तर चांगल्या मताधिक्याने विजय व्हावे हा आमचा प्रयत्न राहील. यामध्ये आम्ही जनतेसमोर प्रामाणिकपणे मुद्द्यांच्या आधारे जाणार आहे त्यामध्ये शेतकऱ्याला मिळणारा हमीभाव असो, युवकांची बेरोजगारी असो, महागाई असो किंवा महिलांवर होणाऱ्या अत्याचार असो अशा अनेक मुद्दे घेऊन आम्ही आमचे विचार जनतेसमोर मांडणार आहे. या निवडणुकीदरम्यान मविआ पक्षांचा वचननामा आहे यामध्ये महालक्ष्मी योजना जी महिलांसाठी राहील त्यामध्ये महिलांना दरमहा 3 हजार रुपये देण्यात येईल तसेच जनतेच्या आरोग्यासाठी व 25 लाखापर्यंत मोफत सुविधा सोबतच बेरोजगार युवकांना 4 हजार रुपये महिना तसेच महिलांना व विद्यार्थी मुलींना मोफत एसटी बस काँग्रेसचे वचननामा देण्यात आलेले आहे हे अशा अनेक मुद्द्यावर जनतेसमोर जाणार आहे व महाविकास आघाडी उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर या निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे.