प्रजा ही राजा मी फक्त सेवेकरी:– डॉक्टर संजय कुटे
भाजपचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांचे महायुती संपर्क प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले त्या वेळी
शेगाव:- मतदारसंघातील जनतेने मागील वीस वर्षापासून दिलेला आशीर्वाद व कार्य करण्याच्य उर्जे मुळेच आज मतदारसंघाचा विकास साधता आला पुढे हा विकास गतिमान करण्यासाठी जनता मला पाचव्यांदा आशीर्वाद रुपी मत देईल हा आत्मविश्वास आहे. कारण, प्रजा ही राजा, मी फक्त सेवेकरीच या तत्त्वावर मी आजपर्यंत चालत आलो व पुढेही चालत राहणार अशी प्रतिक्रिया उद्घाटन प्रसंगी संतनगरी सुपरफास्ट चॅनलला महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी दिली.
आज सकाळी दहा वाजून तीस मिनिटाला महायुतीचे जळगाव जामोद मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रचार कार्यालयाचे अग्रेशन चौक येथे मोठ्या थाटात अरुणशेठ शर्मा यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले सोबत रामेश्वरजी शर्मा, विनोदजी तिवारी, बनवारीलालजी जोशी, विनोद शर्मा व ब्राह्मण समाजाचे कार्यकर्त्यांसह महायुती च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी लाडक्या बहिणींची सर्वात जास्त गर्दी पहावयास मिळाली.