नीलेश भोकरे :-
करजगाव : शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजगावात मंगळवारी दुपारी 2 वाजता दरम्यान कारवाईची चर्चा चांगलीच रमली त्याला स्थानिक पोलिसांनी दुजोराही दिला.मात्र ती कारवाईत गुटखा मिळालाच नसल्याची दुसरे दिवशी पुढे आले.
शिरजगाव कसबा ठाण्याच्या हद्दीतील गावे हे गुटखा तस्करीचे माहेर घर आहे आय पी एस निकेतन कदम यांचे नंतर मोठी कारवाई करण्यात आली नाही हे विशेष आहे.
शिरजगाव पोलिसांनी करजगाव येथील बहिरम रोड वरील एका घरातून कारवाई करत गुटखा जप्त केल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे गुटखा माफियांचे काही काळ का होईना धाबे दणाणले होते. त्यात कारवाई होत असल्याची पुष्टी स्वतः पोलीस कर्मचारी यांनी केली. एका अधिकाऱ्याला व कर्मचारी यांना भ्रमणध्वनी वर संपर्क केला तर गुटखा जप्तीची कारवाई सुरू असल्याची माहिती दिली. तर त्या कारवाई सायंकाळी विचारणा केली असता कारवाई झालीच नाही .पोलीस घटनास्थळी गेले होते परंतु त्यांना सुगंधित सुपारी मिळाली त्यामुळे गुटखा न मिळाल्याने गेल्यापावली परत आले असल्याची माहिती शिरजगाव कसबा चे ठाणेदार महेंद्र गवई यांनी दिली.
स्थानिकांनी पाहिलेली कारवाई कोणती ?
गुटखा कारवाई करत असल्याचे खुद्द पोलीस कर्मचारी सांगत होते मग दुसरे दिवशी तो गुटखा नसून सुगंधित सुपारी कशी झाली अश्या चर्चांना पेव फुटले आहे. स्थानिक पोलीसांच्या कारवाई वर शंका व्यक्त केल्या जात आहे. ही अशी पहिलीच कारवाई नसून स्थानिक पोलीस अश्या कारवाई साठी महारथ असल्याची चर्चा खुद्द अवैध व्यावसायिक यांचे मध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्या कारवाईत गुटखा नव्हता तर कारवाई इतका वेळ का चालली. व पोलीस कर्मचारी का सांगत होते गुटखा कारवाई सुरू आहे ?
करजगाव येथे बोदड रोड एका व्यक्तीचे घरी धाड मारली असता गुटखा आढळून आला नसून फक्त सुगंधित सुपारी,निसर्ग पूढी मिळाल्या .
महेंद्र गवई
सहा.पोलीस निरीक्षक
पोलिसांनी कारवाई केली तेव्हा एक गाडी गुटखा माल जप्त केला होता.त्यांनतर संबधित व्यक्तिला सोबत नेले होते.
प्रत्यक्षदर्शी नागरिक