*केंद्र व राज्य सरकारच्या योजना घरोघरी जाऊन मतदारांना सांगा : महांतेश कवठगीमठ; कडेगावात संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारासाठी बुथ सदस्यांची बैठक*
सांगली/कडेगाव न्युज :
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना मतदारांपर्यंत घरोघरी जाऊन सांगा आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणा, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवठगीमठ यांनी केले.
कडेगाव-पलूस विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचार नियोजनासाठी बूथ क्रमांक 1 ते 141, बुथ अध्यक्ष व सदस्यांची बैठक महांतेश कवठगीमठ यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या अनेक योजना राबवलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, विविध जनसमुदायांसाठी अनेक योजना आणि महामंडळे निर्माण करण्यात आलेली आहेत या सर्व योजनांची माहिती आपण घरोघरी जाऊन दिली पाहिजे आणि महायुतीचे सरकार जनतेसाठी किती फायद्याचे आहे हे समजावून सांगितले पाहिजे. त्यामुळे संग्रामसिंह देशमुख यांचे मताधिक्य वाढण्यासाठी मदत होणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी आजपासून या सर्व योजनांची माहिती घरोघरी जाऊन द्यावी.
या बैठकीस कडेगाव मंडल अध्यक्ष अशोक साळुंखे, जिल्हा मुख्य सचिव विलास काळेबाग, अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष मुक्तार पटेल, भाजपा सांगली जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष राजाराम गरुड, कडेगाव शहर नगराध्यक्ष धनंजय देशमुख बुथ सदस्य व स्थानिक नेते उपस्थित होते.१) कडेगांव येथे भाजपा बुथ कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवठगीमठ, सोबत राजाराम गरुड, धनंजय देशमुख, मुक्तार पटेल आदी.
२) कडेगांव येथील भाजपा बुथ कमिटी अध्यक्ष व सदस्यांच्या बैठकीत सहभागी कार्यकर्ते