वंचित उमेदवार डॉ. प्रवीण पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचा थाटात शुभारंभ

85

वंचित उमेदवार डॉ. प्रवीण पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचा थाटात शुभारंभ

शेगाव:- जळगाव जामोद मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी च्या प्रचार कार्यालयाच्या सुरुवातीनंतर आज 9 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान करण्यात आला. त्यावेळी उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांनी बुत प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग घेत तसेच इतर वरिष्ठ व एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि आपण कशाप्रकारे विजय होऊन आपल्या नेत्याला म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर यांना राज्यसभेपर्यंत कसे पाठवू शकतो या निर्धार वर आपण प्रत्येक बुथवर आपली जबाबदारी पार पाडून जास्तीत जास्त उमेदवार कसे मतदान करतील याची सूचना त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली त्यासोबत काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या कामावर बोट ठेवत आपल्याला पुढे कसे चालायचे आहे यांच्यावर सुद्धा त्यांनी विचार मांडला व आपला विजय निश्चित आहे या कामाने कामाला लागा व आपण या वचननाम्याखाली काम करतोय भविष्यात करायचे आहे हे जनतेला पटवून सांगितले.