पुष्पहार व आरतीने डॉ. संजय कुटे यांचे केले अनेकांनी स्वागत…
शेगाव:- जस जशी मतदानाची तारीख जवळ येतेय तस तशी प्रत्येक पक्षाकडून आपला प्रचार जोराने आणि जास्त ताकतीने करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. अशातच जळगाव जामोद मतदारसंघामधील सर्वात मोठ्या व निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या शेगांव शहरात भाजप पक्षाच्या प्रचार रॅलीला सकारात्मक प्रतिसाद स्थानिक पातळीवर पाहायला मिळत आहे.
महायुतीचे उमेदवार भाजपचे डॉ संजय कुटे यांची प्रचार रॅली शेगांवातील वार्ड क्रमांक १, 2 आणि 3 मध्ये आली असता अनेक स्थानिक नागरिकांनी त्या रॅली चे स्वागत केले तसेच अनेक लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांनी डॉ संजय कुटे यांचे ओक्षण करून त्यांना आशिर्वाद दिला तर काही नागरिकांनी पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या तर प्रचार रॅली तील युवा वर्गाला उमेदवार डॉ. कुटे यांच्या सोबतीचा सेल्फी फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. भारतीय जनता पक्षाचे सुरू असताना सर्व दूर जेजेकार होत पुन्हा तुम्हीच सगळे करून म्हणून आम्हाला हवेत असे बोल व उच्चार माळीपुरा येथील लोकांनी उच्चारले व आपणाच निवडून याल असा भरभरून आशीर्वाद सुद्धा दिला अशा प्रचंड रॅलीमध्ये लोकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग दिसून आला.