*जनतेचे प्रेम आणि विश्वास लाख मोलाची शिदोरी* -यशोमतीताई ठाकूर

 

*नेर पिंगळाई येथील प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन*

नागरिकांचा मिळतोय उदंड प्रतिसाद

अमरावती (प्रतिनिधी)
लोकांचे माझ्यावरील प्रेम आणि त्यांचा विश्वास ही माझ्यासाठी लाखमोलाची शिदोरी आहे.मी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,परमेश्वराने माझ्यामागे ही जी भक्कम साथ उभी केली ही निरंतर राहील,असे अभिवचन महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी दिले. नेर पिंगळाई येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
तिवसा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ नेर पिंगळाई येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून यशोमती ठाकूर यांना समर्थन दिले. नागरिक मोठ्या संख्येने प्रचाराला उपस्थित राहत असल्याने ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी नागरिकांनी यशोमती ठाकूर यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद देत त्यांचे जंगी स्वागत केले. उपस्थित हजारो नागरिकांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना दणदणीत समर्थन दर्शविले. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे देवीचे दर्शन घेऊन यशोमती ठाकूर यांनी प्रचार यात्रा काढली. गावातील हजारो महिलांनी रस्त्यावर येत यशोमती ठाकूर यांचे जंगी स्वागत केले. आपल्या लाडक्या लोकनेत्या यशोमती ताईंना समर्थन देण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली होती. तिवसा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने यशोमती ठाकूर या चौथ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येथील अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. यशोमती ठाकूर यांच्या प्रचार यात्रेत होत असलेली गर्दी पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांनी मोठा विकास केला आहे. प्रत्येक गावात विविध योजना राबवून गाव पातळीवरील विकास, ही त्यांच्या कामाची पावती आहे. त्यामुळे याही वेळेस या भागातील जनता त्यांना निवडून देतील अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
यशोमती ठाकूर यांना आम्ही अनेक वर्षापासून ओळखतो.त्या आमच्या गावचा आणखीन विकास करतील, त्यांना आम्हाला मोठ्या पदावर बघायचे आहे. विदर्भाला त्यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व लाभलं, हे नेतृत्व जपलं पाहिजे आणि त्यांना आपण साथ दिली पाहिजे असा सूर महिला वर्गामध्ये होता. केवळ जिल्हा पुरतेच नव्हे तर, राज्याच नेतृत्व करण्याची क्षमता यशोमती ठाकूरमध्ये आहे.त्यामुळे त्यांना भक्कम साथ द्या आणि निवडून आणा असे आवाहन उपस्थित नागरिकांना गावकऱ्यांनीच केले.
प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रमेश काळे, बाळासाहेब पुंड, संजय मंगळे,रमेश टोपले, मनोज टेकाडे, गजानन ठवळी,महेश राऊत,प्रवीण काळमेघ,श्याम बेलसरे,संजय कुरळकर, पंजाबराव वानखडे, सुनील वांगे, पवन काळमेघ,निलेश तठ्ठे,वैभव ढोरे,तायवाडे,चेतन वानखडे, प्रतीक घोरमाडे, बंटी वानखडे, तनय वानखडे, केतन अलोने, तेजस गोहत्रे,संजय पुंड, राजूभाऊ डहाणे, सुरज अवचार, अतुल खोडसकर ,साजिद पठाण, सुनील डहाके,माधव टोपले, अश्विन कुरपडे ,किशोर पाटील,प्रवीण बडासे, मनीष देशमुख, बंडूभाऊ कनेर, प्रमोद गावंडे, विपिन ढोके, अनिकेत तायवाडे,कुणाल तायवाडे, राजूभाऊ पराडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.