प्रस्तापित आमदारांनी मतदार संघातील जनतेचा विश्वास घात केला : संभाजी राजे छत्रपती यांचा आरोप

44

प्रस्तापित आमदारांनी मतदार संघातील जनतेचा विश्वास घात केला : संभाजी राजे छत्रपती यांचा आरोप

शेगाव – बुलडाणा
महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये केवळ घोषणांचा पाऊस पडलेला आहे. आता त्यांना कापूस, सोयाबीनचे हमीभाव दिसतात. निवडून आल्यावर कर्जमाफी देऊ म्हणतात. आतापर्यंत सरकार त्यांचेच होते. कर्जमाफी पण सोडाच आतापर्यंत अतिवृष्टीचे पैसे नाहीत, पिक विम्याचे पैसे नाहीत, एक साधा प्रक्रिया उद्योग सुद्धा २० वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीने ह्या मतदारसंघात आणला नाही. जळगाव जामोद, विधानसभेची लढत ही प्रस्तापिताविरुद्ध लढाई आहे. असा आरोप छ्त्रपती संभाजी राजे यांनी पत्रकारांना संबोधित करतांना म्हटले शेगाव शहरातील हॉटेल नंदनवन येथे दिनांक 11 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
पुढे बोलतांना छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की
छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते, आम्ही सुद्धा रयते सोबतच आहे. प्रशांत सुद्धा रयतेचा राजा आहे.जनतेच्या मनातला आमदार आहे. आमचा महाराष्ट्र स्वराज पक्ष हा शेतकरी ,शेतमजूर, मागासवर्गीय, दिन दलित वंचितांचा पक्ष आहे.
परिसरातील जनतेला वीस वर्षात फक्त मुंगीरेलालचे हसीन स्वप्न दाखविले. आता कोणत्याही भूल थापांना बळी न पडता जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना प्रचंड मतांनी विजयी करा व व परिवर्तन घडवा असे आवाहन परिवर्तन महाशक्ती चे संयोजक तथा महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अध्यक्ष राजे छत्रपती संभाजी यांनीजनतेला केले आहे.
.