अमरावती ब्रेकिंग :- भीषण अपघातात दोघांचा मृत्यू ; दोन जण जखमी

10726

चांदुर बाजार :-

लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्याकरिता जात असताना काल मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान  चारचाकी वाहनाला कोंढाळी नजीक भीषण अपघात  झाला या घटनेत सोपान नितीन कोरडे व ऋषिकेश गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अजिंक्य बाळासाहेब वाकोडे, ऋषिकेश खोंड हे दोघे जखमी झाले.

बच्चू कडू यांनी आधी कोंढाली येथील रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेतली घटनेबाबत माहिती घेतली त्यानंतर लगेच नागपूर येथील खासगी रुग्णालय गाठून दोन्ही जखमींची आस्थेने विचारपूस करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. तसेच डॉक्टरांना भेटून विशेष लक्ष देण्याची विनंती केली.