प्रतिनिधी: आज २६ नोव्हेंबर २०२४ भारतीय संविधान दिवस निमित्ताने डॉ. अलिम पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत इर्विन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाने आम्हा सर्वांना जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांची प्रगती झाली. आपल्या हक्कांसाठी लढण्याचे बळ मिळाले. जनतेच्या मुलभूत अधिकारांवर जर गदा येत असेल तर आम्ही सर्व मिळून हक्कांसाठी लढत राहु असे यावेळी डॉ अलिम पटेल यांनी सांगितले. यावेळी मुख्य महासचिव मनिष साठे, प्रदेश प्रवक्ता किरण गुडधे, जिल्हाध्यक्ष सनी चव्हाण, शहर अध्यक्ष विपुल चांदे, रविंद्र फुले, अन्सार बेग, अर्शद पठाण, डॉ बशिर पटेल, विजय सवई, लक्ष्मण चाफळकर, मुजफ्फर खान, आदी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.