लेट. बी. एस. देशमुख स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली अभ्यासाकीय भेट…

270

लेट. बी. एस. देशमुख स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली अभ्यासाकीय भेट…

शेगाव येथील स्व.भाऊराव शिवरावजी देशमुख बहुउद्देशीय संस्था शेगाव द्वारा संचालित लेट. बी. एस. देशमुख इंग्लिश स्कूल यांनी शेगावची मार्केट व्हिजीट म्हणून बँकेला जाऊन भेट दिली यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा तसेच देवाण-घेवानाचा व्यवहाराचा हेतू लक्षात घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात याबद्दल संपूर्ण माहिती असावी कारण हाच विद्यार्थी उद्याच्या भारताचा सुजाण नागरिक असणार आहे. त्या अनुषंगाने हे विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात मागे नसावा हा हेतू लक्षात घेत आज इयत्ता ०३ ते इयत्ता ०६ च्या सर्व विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राची संपूर्ण ज्ञान व्हावे बँकेतील विल्स अँड एज्युकेशन काय आहे बँक म्हणजे काय? बँक मध्ये कसल्या प्रकारचे देवाण-घेवाण होते? बँक मध्ये पैसे ठेवण्याची पद्धत, व्याजदर कसे असतात सोबतच बँकेमध्ये अकाउंट म्हणजेच बचत खाते कसे उघडतात त्यामध्ये पैसे कैसे भरावेत आणि काढावे त्यासोबतच इतरही संबंधित स्लिप चा कसा वापर करावा लागतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ATM कार्ड याचा वापर कसा केला जातो व याची नियमावली काय या आहे अशा सर्व प्रश्नांचा उलगडा शाळेचे विद्यार्थ्यांनी तेथे केला सर्वप्रथम HDFC बँकेच्या व्यवस्थापकांनी या चिमुकल्यांचे स्वागत करून संपूर्ण माहिती दिली याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने जिज्ञाशाने वृत्तीने बँक कर्मचाऱ्यांशि अनेक विविध प्रश्नांवर चर्चा केली सोबतच हवी ती माहिती नोट करून घेतली. याप्रसंगी सर्व शालेय शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती व शिक्षकांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचे आभार मानले. की त्यांनी आम्हा सर्वांना सहकार्य केले. या भेटीदरम्यान बँक व्यवस्थापकाने सर्व विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.
शालेय शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्केटिंग ज्ञानामध्ये कशी भर होईल या उद्देशाने शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना HDFC बँक येथील कर्मचाऱ्यांची संवाद साधला. त्यांना केवळ पूर्ववृत्त ज्ञान नव्हे तर जीवनात आवश्यक त्या व्यवहारिक ज्ञानाचाही लाभ व्हायला पाहिजे या हेतूने ही भेट देण्यात आली.