पाटील घराण्यातील कुटुंबासाठी आज दुग्धसरकरास योग माणिकराव पाटील यांच्या नगरपरिषद सेवानिवृत्त चा सत्कार तर पत्रकार नानाराव पाटील यांच्या वाढदिवस.
दोन्ही भावंडांसाठी अवास्मरणीय क्षण.
*प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माणिकराव पाटील*:– डॉक्टर जयश्री काटकर. शेगाव :— मागील दोन अडीच वर्षापासून शेगाव नगरपालिकेचा कार्यभार पाहत असताना बांधकाम विभागातील कर्मचारी असलेले माणिकराव पाटील यांच्या वर काहीही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी त्यांनी अतिशय काटेकोरपणाने सांभाळलेली आहे व आपल्या चौकटीत राहत वेळेचे काटेकोर पालन करीत सर्वाशि हसतमुख राहत नगरपालिकेत सेवा देणारे प्रामाणिक कर्मचाऱ्यांच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माणिकराव पाटील असल्याचे गौरव उद्गार नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, प्रशासक डॉक्टर जयश्री काटकर (बोराडे )यांनी सेवापुर्तीचा गौरव सोहळा या कार्यक्रमात काढले
दिनांक १ डिसेंबर रविवार रोजी हॉटेल साई गजानन इन मध्ये नगरपरिषदचे सेवानिवृत्त कर्मचारी माणिकराव वामनराव पाटील यांच्या सेवापूर्तीचा गौरव सोहळा करण्यात आला त्यावेळी व्यासपीठावर गौरव मूर्ती माणिकराव पाटील व त्यांच्या सुविद्ध पत्नी माधुरी पाटील तर सोबतच योगायोगाने त्यांचे लहान बंधू पत्रकार नानाराव पाटील यांचा वाढदिवस सहकुटुंब केक कापून साजरा करण्यात आला. नंतर कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी आपले मनोगत मांडले या क्षणी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक नगर परिषद चे मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक विजय यादव, संदीप काळे ,शैलेश पटोकार ,राजेश अग्रवाल ,ज्ञानेश्वरआप्पा साखरे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रवीकुमार राऊत पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सचिन गजाननराव पाटील अकोला व आभार पत्रकार नाना पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी शहर ठाणेदार नितीन पाटील, काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले, माजी नगराध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील,पुरुषोत्तम शेगोकार, शकुंतलाताई बुच ,भाजप नेते पांडुरंग बूच, गजानन जवंजाळ,डॉ. रवी कराळे, पद्माकर माळी ,नगरपालिकेचे अधिकारी इंजिनियर संजय मोकासरे, इंजिनियर दीपक बांगर ,इंजिनियर श्याम गवले ,शक्तीबापु देशमुख सह सर्व कर्मचारी पत्रकार राजेश चौधरी, अनिल उंबरकर ,संजय त्रिवेदी ,महेंद्र मिश्रा ,समीर देशमुख सह पत्रकार व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच माझा कार्यकाळ चांगला गेला:– विजय यादव
कमी वयात नगरसेवक झालो होतो मला कुठलाही प्रशासकीय अनुभव नसताना विकास कामाची लगन होती व त्यामुळे मी पदाधिकारी कर्मचारी यांचा मार्गदर्शन घेत होतो व त्या काळात मला माणिकराव भाऊंनी जे मार्गदर्शन केलं ते फार मोलाच होतो आणि अशा कर्मचाऱ्यांमुळेच माझा विकासाचा कार्यकाळ गेला असल्याचे सुतवाच या कार्यक्रमात माजी नगरसेवक विजय यादव यांनी केले