अमरावती महानगरपालिका द्वारा संचालीत स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासीका केंद्राचे यश; ५ विद्यार्थ्‍यांची विविध पदांवर निवड

अमरावती महानगरपालिका तर्फे संचालीत स्‍पर्धा परिक्षा ग्रंथालय / अभ्‍यासिकामुळे, अंकुश कंटाळे, मयुरी गादरे, मयुरी गणवीर यांची कनिष्‍ठ लिपिक, जिल्‍हा न्‍यायालय अमरावती तर रेणुका भोजने यांची कनिष्‍ठ लिपिक जिल्‍हा न्‍यायालय ठाणे तसेच राजपाल लोखंडे यांची नागपूर कारागृह पोलीस या पदावर नियुक्‍ती झालेली आहे.

यश प्राप्‍त केलेल्‍या विद्यार्थ्‍यांचे मनपा उपायुक्‍त नरेंद्र वानखडे यांनी पुष्‍पगुच्‍छ देवुन अभिनंदन केले.