श्री संत गजानन महाराज कॉलमेंटच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा

690
Oplus_131072

श्री संत गजानन महाराज कॉलमेंटच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा

शेगाव:- दिनांक 17 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर श्री संत गजानन कॉलमेंटचे विद्यार्थी वेदांत रूपाली महेंद्र मिश्रा आणि सार्थक गणोरकार हे दोघे शाळेतून घरी परत येत असताना स्थानिक एसबीआय कॉलनी मार्गावर एक लेडीज पर्स पडलेली होती यांनी ती पर्स हातात घेतली आणि आजूबाजूला विचारले असता तिथेच राहणारे सौ मनीष कुरील या बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितलं की ही पर्स माझी आहे या पर्समध्ये पाच बांगड्या आणि काही पैसे होते सौ मनीष कुरील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मी काही वेळा अगोदर मार्केट मधून दुचाकी वाहनाने आली आणि घरात गेली त्या गडबडीमध्ये ही पर्स माझ्या हातून पडली आणि जेव्हा या मुलांनी मला विचारले त्यावेळेस मला समजलं की माझी पर्स हरवलेली आहे तर सौ मनीष कुरील यांनी पर्स चेक करून पर्स मधून शंभर रुपये काढून विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला परंतु विद्यार्थ्यांनी आम्हाला पैसे नकोत असे म्हणत ते घरी आले घडलेला संपूर्ण प्रकार त्यांनी घरी आई-वडिलांना सांगितला ही संपूर्ण बाब ऐकून आई-वडील आणि घरातील इतर मंडळी हर्षित होऊन त्यांनी या दोन्ही मुलांची पाठ थोपटून यांना शाबासकी दिली या कार्याबद्दल या दोन्ही मुलांचे प्रत्येकाकडून कौतुक होत आहे आई-वडिलांनी शिकवलेला प्रामाणिकपणा आणि शाळेत मिळालेलं योग्य शिक्षण याकरिता वर्गशिक्षक संगीता धनोकार ( उमक )मुख्याध्यापिका कविता पाटील याच्यामुळेच आमच्या मनात कोणतीही लालसा उद्भवली नाही असं मत दोन्ही चिमुकल्यांनी व्यक्त केलं