संस्कारातुनच राष्ट्रप्रेमी पिढि घडते
कैलास मेसरे जिल्हा कार्यवाह
शेगाव:- दि5जानेवरी
छोट्या मुलांच्या वर झालेल्या योग्य सुसंस्कातुनच भविष्यातील राष्ट्रप्रेमी पिढि घडते असे रास्व संघाचे जिल्हा सहकार्यवाह कैलास मेसरे यांनी म्हटले आहे
रा स्व संघ शाखा शेगाव च्या वतीने आळसणा रोडवरील म्हाडा वस्तीत सुसंस्कार शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते देश मजबुत संघटित संस्कारीत घडवायचा असेल तर देशातील प्रत्येक घटकातील बालकांना सुसंस्कारीत केले पाहिजे या मोठ्या ध्येयाला समोर ठेवुन संपुर्ण देशभर रास्व संघाच्या वतीने सुसंस्कार शिबीरे निरंतर चालवण्यात येणार आहे त्याच एक भाग म्हणुन शेगाव मधे म्हाडा काँलनीत हे शिबीर सुरू करण्यात आल्याचे मेसरे यांनी म्हटले
बालकांना संस्कारीत करा
श्रीराम पुंडे
बालकांना घरातुन संस्कारीत करा असे आवाहन रा स्व संघ शेगाव तालुका संघचालक श्रीराम पुंडे यांनी म्हटले आहे घरात प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलासमोर चांगली वागणुक नेहमीच ठेवली पाहिजे जेणेकरून ते मुल ईतर कोणतयाही वाईट मार्गाला न लागता चांगल्या मार्गाने आपले आयूष्य जगु शकेल व पुढे आईवडिल कुटुंब समाज व देशधर्माचे सेवा करेल त्यामुळे अशा संस्कार शिबीराला आपल्या मुलांना जरूर पाठवा असे आवाहन पुंडे यांनी केले
आभार व संचलन आशिष पांडे यांनी केले यावेळी वर्गमार्गदर्शिका नंदाताई मानकर व इतर स्वयंसेवक पदाधिकारी व शिबीरार्थी उपस्थीत होते हे संस्कार शिबीर दररोज सायंकाळी 6ते7वाजे पर्यत म्हाडा काँलनीत चालणार आहे.