व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेकडून पत्रकार दिन साजरा…
ज्येष्ठ पत्रकार महेंद्र व्यास यांचा सत्कार!
शेगाव:– दि. ०६ जानेवारी २०२५
आज पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेद्वारे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार महेंद्र व्यास यांचा सत्कार संघटनेच्या वतीने घेण्यात आला.
पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून परिचित असलेली व्हाईस ऑफ मीडिया संघटनेने ६ जानेवारी आज वाटिका चौकात असलेली हॉटेल शिवालय गेस्ट हाऊस येथे सकाळी 11:30 च्या दरम्यान पत्रकार दिन साजरा केला त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनोने, तालुका अध्यक्ष नानासाहेब पाटील, तालुका उपाध्यक्ष महेंद्र कुमार उर्फ बालू मिश्रा, आणि सत्कारमूर्ती म्हणून ज्येष्ठ पत्रकार महेंद्र व्यास यांची उपस्थिती होती. सुरुवातीला आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व मान्यवरांच्या स्वागतानंतर ज्येष्ठ पत्रकार महेंद्र व्यास यांचा सत्कार व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेद्वारे करण्यात आला. व्यास यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ” आपल्या तीस वर्षाच्या पत्रकारितेच्या कार्यकाळात अनेक उतार चढाव पत्रकार म्हणून पाहिले. परंतु पत्रकारिता करत असताना सर्वसाधारण पत्रकाराचे जीवन हे अधिक कष्टाचे आहे, पत्रकार हा नेहमी सत्य दाखवतो ती सत्य बाजू मांडताना पत्रकारांनी कधीही दुजेपणा आणू नये” अशा प्रखर शब्दात पत्रकारितेचे वास्तव त्यांनी मांडले त्यावेळी प्रकाश उन्हाळे, राजकुमार व्यास, सतीश अग्रवाल,दिनेश महाजन, ललित देवपुजारी, ज्ञानेश्वर ताकोते, गणेश शेजोळे, सुधाकर बावस्कर, विठ्ठल आवताडे, मंगेश पाटील, ददगाळ, हिंगणे आदी पत्रकारांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समीर देशमुख यांनी तर सूत्रसंचालन प्रा. रोहित देशमुख यांनी केले.
व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांचा आवाज:- नानासाहेब पाटील
सर्वसामान्य पत्रकारांचा आवाज हा व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहे. ही संघटना पत्रकारांनी पत्रकारांच्या हितासाठी उभी केलेली संघटना असून संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हिताचे संरक्षण, सामाजिक, आर्थिक आणि आरोग्याची बाबत संघटनेमार्फत अनेक योजना चालवल्या जातात.
नव पत्रकारांना प्रोत्साहन द्यावे :- संजय सोनोने
दिवसेंदिवस काळ बदलत चालला आहे जगाची गती वाढत चालली आहे तसेच तरुणांचे पत्रकारिता क्षेत्राकडे येण्याकडे कल दिसत असून नवपत्रकारांना प्रोत्साहन द्यावे, इतर पत्रकारांनी त्यांना मार्गदर्शन करावे.