खासदार रक्तदान मोहिमेचा डॉ.अनिल बोंडे यांनी घेतला आढावा : डीएचओ, सीएस यांची उपस्थिती; रक्तदान मोहीम आणखीन गती घेणार

 

अमरावती : राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून खासदार रक्तदान महायज्ञ मोहिमे अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात सतत 365 दिवस रक्तदान शिबिर आयोजित केली जात आहेत. या मोहिमेला जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळातील अनेक तारखा देखील रक्तदानाच्या बुक झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण बाबीचा आढावा डॉ. अनिल बोंडे यांनी घेतला. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले यांनी यासंदर्भातील माहिती त्यांना दिली.

खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. वसुधा बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात नवीन वर्षापासून अर्थात १ जानेवारी २०२५ पासून खासदार रक्तदान महायज्ञाला सुरुवात झालेली आहे. सतत ३६५ दिवस संपूर्ण अमरावती जिल्ह्यात डॉ. अनिल बोंडे यांच्यातर्फे रक्तदान शिबिर घेतले जात आहेत. या शिबिरांना व्यापक असा प्रतिसाद मिळत आहे. शिबिरातून प्राप्त होणारे ब्लड हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त पिढीला दिले जात आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक व्यापकपणे राबवण्याच्या सूचना डॉ.अनिल बोंडे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहेत. उन्हाळ्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे अनेक गरजवंत रुग्णांना रक्त मिळण्यास अडचणी येतात. ही बाब लक्षात घेता पुढील काही महिन्यांचे नियोजन देखील डॉ.अनिल बोंडे यांच्याकडून करण्यात आलेले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौंदळे, डॉ. सुरेश आसोले, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, योगेश पानझडे, खासदार प्रतिनिधी म्हणून या मोहिमेत जातीने लक्ष घालून शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार्या वैदही उपासने, रविकिरण वाघमारे, सुनील सोमवंशी, ऋषिकेश दुर्गे, धीरज चौधरी, प्रीतम आ अब्रुक, रमेश वराडे, गिरीश काळे, यश गवई, शुभम मांडळे, शंतनू बांबल यांच्यातर्फे देखील रक्तदान मोहीम आयोजन नियोजन समन्वय आणि मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
_____

रक्तदान शिबिरासाठी पुढे या – खासदार अनिल बोंडे

नवीन वर्षापासून सुरू झालेली ही रक्तदानाची मोहीम पाहता पाहता सर्व नागरिकांच्या यशस्वी प्रतिसादामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. अनेक ठिकाणाहून रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी संपर्क केला जात आहे. ज्या ठिकाणी शिबिर संपन्न झाली, अशा सर्व नागरिकांचे डॉ.अनिल बोंडे यांनी आभार मानले आहेत. तर आगामी काळात शिबिर आयोजित करण्यासाठी सामाजिक संस्था, भाजप पदाधिकारी नागरिकांनी समोर यावे, असं आव्हान देखील त्यांनी केले आहे. जेणेकरून भविष्यात रक्ताविना कोणत्याही रुग्णाला प्राणापासून मुकावे लागणार नाही, अशी वेळ कुणावरही येऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या या महायज्ञात योगदान द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.