राष्ट्र समर्था ‘देवी अहिल्या की पुण्यगाथा’ महानाट्य 3 फेब्रुवारी रोजी ; विश्व मांगल्य सभेची माहिती

 अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार सांस्कृतिक भवन येथे भव्य स्वरुपात आयोजन

 

अमरावती – पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विश्वमांगल्य सभेच्या वतीने, पहिल्यांदाच अमरावतीमध्ये “राष्ट्र समर्थ देवी अहिल्या की पुण्यगाथा” या ऐतिहासिक नाटकाचे आयोजन होतं आहे. 3 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम होतं आहे. अमरावतीकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन विश्व मांगल्य सभेतर्फे बुधवारी (ता.29) पत्रपरिषदेत करण्यात आले.
अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे पिठाधिश्वर पं.पू.जितेंद्रनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वमांगल्य सभा ही महिलांची एक राष्ट्रीय संघटना आहे. भारतीय संस्कृतीचा आत्मा आपली कुटुंब व्यवस्था आहे. या कुटुंबाचा मुख्य आधार आणि केंद्रबिंदू प्रत्येक घराची आई आहे. विश्व मांगल्य सभेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सशक्त, सुसंस्कृत, कुटुंबाभिमुख, हुशार महिला आणि माता निर्माण करणे ज्यांना राष्ट्र आणि धर्मावर गाढ श्रद्धा आहे. अशाच एका तेजस्वी स्त्री, राष्ट्र समर्थ देवी अहिल्याबाई यांचा इतिहास पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी, विश्वमांगल्य सभा अमरावती शाखेतर्फे एक भव्य महानाट्य अर्थात राष्ट्र समर्था ‘देवी अहिल्या की पुण्यगाथा’ हा विशेष कार्यक्रम 3 फेब्रुवारी 2025 रोजी अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या महानाट्यामध्ये नागपूर-मुंबई येथील 45 पेक्षा अधिक कलाकारांचा समावेश असून त्यामाध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांचा संपूर्ण जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर उपलगडला जाणार असल्याचेही विश्व मांगल्य सभेतर्फे सांगण्यात आले. बनारस येथील नमो घाटावरून या महानाट्याची सुरूवात झाली असून आगामी काळात देशाच्या विविध भागात 51 ठिकाणी या महानाट्याचे आयोजन होणार आहे. आतापर्यंत 10 पेक्षा अधिक ठिकाणी या नाट्याचे प्रयोग पुर्ण झाले आहेत. अमरावतीकरांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संपूर्ण जीवनप्रवास याची देही याची डोळा अनुभवन्याची ही सुवर्ण संधी असून नागरिकांनी या महानाट्याच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. पत्रपरिषदेला डॉ.वसुधा अनिल बोंडे, विदर्भ प्रांत संघटन मंत्री तेजसा जोशी, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष रश्मि मोहन जाजोदिया, विश्व मांगल्य सभा अमरावतीच्या अध्यक्ष श्वेता पांडे, रश्मी इटकिकर, राष्ट्रीय बालसभा संयोजिका अंजली देव, सविता गुढे यांच्यासह अन्य उपस्थित होते.