नांदगाव खंडेश्वर :-
दर्शन पुंडलीक दिकोंडवार,वय -३८ वर्ष, पद-पोलीस उपनिरिक्षक, नेमणुक पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर, ह्याने पोलिस स्टेशनच्या आवारातच लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.मात्र वेळेवर संशय आल्याने ती रक्कम ठरलेल्या वेळी न स्वीकारता “टाळाटाळ केल्या”ने सदरहू दोघांवरही अखेर लाचेची मागणी केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आल्याने अमरावती पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांनी दि.१२/०३/२०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरुन दि.१३/०३/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांना लोकसेवक दर्शन पुंडलीक दिकोंडवार, वय -३८ वर्ष, पद-पोलीस उपनिरिक्षक, नेमणुक पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर, अमरावती ग्रामिण रा.शिरे लेआउट,चौधरी हॉस्पीटल रोड,अवधुतवाडी,यवतमाळ जि. यवतमाळ यांनी तक्रारदार यांचे वडीलांच्या नावे असलेली ट्रक्टरची ट्रॉली सोडुन देण्याकरीता ५००० रूपये लाचेची मागणी केली. तसेच सदर ५,००० रुपये लाच रक्कम सुकेश सारडा याचेजवळ देण्यासाठी सांगितले. त्यावेळी सुकेश सारडा याने तक्रारदार यांना सांगितले की, मी तुला फोन केल्यावर येवुन जा.असे बोलुन सदरचे पैसे लाच रक्कम असल्याचे माहीत असताना सुध्दा लाचेची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली व दर्शन दिकोंडवार यांस गुन्हा करणेकामी मदत केली.मात्र दि.१३/०३/२०२५ रोजी दुपारी ३/३५ ते ४/४८ वाजेपर्यंतच्या दरम्यान आयोजीत सापळा कार्यवाही बाबत दिकोंडवार यांस तकारदार यांचेवर संशय आल्यामुळे त्यांने तकारदार यांचेकडुन लाच रक्कम ५००० रुपये घेतले नाहीत. त्यामुळे काल दि १८/०३/२०२५ रोजी दर्शन पुंडलीक दिकोंडवार व सुकेश अनिल सारडा या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरूध्द लाचेची मागणी केल्यावरून पोस्टे. नांदगाव खंडेश्वर,अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.