अमरावती ब्रेकिंग :- अद्यापपर्यंत अमरावती विमानतळाच्या नावाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही ; अलायन्स एअरच्या पत्रामध्ये नावाचा उल्लेख

अलायन्स एअरच्या पत्रामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ अमरावती असा उल्लेख आलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत विमानतळाच्या नावाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

अलायन्स एअरतर्फे पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये या झालेल्या उल्लेखाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणतर्फे आक्षेप नोंदविण्यात आला असून याबाबत कंपनीला मेल करण्यात आलेला आहे, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने कळविले आहे.