अमरावती दि. 16 – तिवसा विधानसभा संघाचे आमदार राजेश वानखडे यांच्या अमरावती येथील कठोरा रोड भागातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
तिवसा विधानसभा मतदार संघ हा भौगोलिकदृष्ट्या विस्तिर्ण पसरलेला असून अमरावती, भातकुली, तिवसा व मोर्शी या चार तालुक्याचा समावेश आहे. आमदार राजेश वानखेडे यांचे आधीच तिवसा येथे तिवसा व मोर्शी तालुक्याकरिता जनसंपर्क कार्यालय निवडणुकीपूर्वीपासून कार्यरत आहे. परंतु अमरावती व भातकुली तालुक्याचे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून कठोरा नाका ते पोटे कॉलेज रोड येथील आनंद वाडी येथे जय अंबा अपार्टमेंट येथे नव्याने निर्मित जनसंपर्क कार्यालयाचे मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने विधिवत उद्घाटन करून नागरिकांच्या सेवेत लोकार्पीत केले. मतदार संघातील अमरावती व भातकुली तालुक्याचा नागरिकांचा सोयीच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी शुभेच्छा देऊन या माध्यमातून नागरिकांची चांगली सेवा घडण्याकरिता आमदार राजेश वानखडे व त्यांचे सुविद्य पत्नी सौ.आरती राजेश वानखडे यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांचे समवेत महसूल मंत्री तथा पालकमंत्री श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे, जलसंपदा मंत्री श्री.गिरीशजी महाजन, आ. संजयजी कुटे, माजी खासदार नवनीतजी राणा, माजी मंत्री प्रवीणजी पोटे, आ.प्रवीण तायडे, शिवरायजी कुलकर्णी, दिनेशजी सूर्यवंशी, जयंत डेहनकर , सौ.किरणताई महल्ले, सौ. संगीताताई शिंदे, प्रशांत देशपांडे, शेखर भोयर, नितीन गुडधे, विवेक गुल्हाने, प्रामुख्याने उपस्थित होते