भाजप शहराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात?

131
Oplus_131072

*अध्यक्षपदाचा चेंडू आमदार साहेबाकडे गेल्याची चर्चा……*

शेगाव:- मागील काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष कोण याबाबत अनेक वृत्तपत्रांमध्ये वृत्तांत देण्यात आले. परंतु आता ही अध्यक्ष पदाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भारतीय जनता पक्षात अंतर्गत सुरू असलेल्या शहर व तालुका नियुक्त आपल्या भागातील जवळपास पूर्ण झालेले आहेत एकूण 13 नियुक्त पैकी 12 नियुक्त जाहीर झाल्या असून त्यामध्ये शेगाव तालुका ही जाहीर झाला. सर्व शहर अध्यक्ष जाहीर झाले आता राहिला फक्त शेगाव शहराध्यक्ष पद… त्यामुळे भाजप शेगाव शहराध्यक्षपदाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मागील शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून आता शहरात नव्याने अध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याची सर्व स्तरातून लक्ष वेधले आहे. याचे महत्त्वाचे कारण असे की समोर येणाऱ्या आगामी नगरपालिका निवडणुका पाहता सक्षम अध्यक्ष ची धुरा सांभाळणारा कोण? हे फार महत्त्वाचे ठरेल त्याकरिता पक्षात चर्चा असलेले नाव पवन महाराज शर्मा, सचिन धमाळ व संदीप काळे असून यापैकी अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पद एक परंतु दावेदार जास्त असल्यामुळे शेगाव शहराध्यक्ष होण्यास विलंब तर होत नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.
दावेदारा पैकी एक नाव म्हणजे पवन महाराज शर्मा आहे मागील पंचवार्षिक मध्ये नगरसेवक, सभापती म्हणून राहिलेले असून भाजपची चांगली भूमिका निभावत आहे तसेच त्यांच्या शिवशंभो मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यकर्ते ते अग्रेसर राहणार व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्याकडे युवा कार्यकर्ता तसेच कार्यकर्ता यांची चांगली फळी उभी आहे. दोन ते तीन दिवसापूर्वी पवन महाराज शर्मा यांची वर्णी लागल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली व अभिनंदन चे फोन सुद्धा गेले या अफवे मुळे अनेकांनी चांगली तारांबळ उडाली त्यामुळे वरिष्ठांकडे सुरू झालेली इतरांची चढा ओढ….
तर दुसरा नंबर वर आहे सचिन धमाळ हे गेटा बाहेरिल भागातील भाजपचे कट्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धमाळ परिवारातील असून त्यांच्यावर शहर युवा मोर्चाची जबाबदारी सुद्धा आहे तसेच मराठा समाजाचे ते जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे ते मोठे व्यावसायिक सुद्धा आहे अनुभवातून त्यांच्यावर कदाचित शहराध्यक्ष पदांची जबाबदारी दिले जाणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे.                                             तर तिसरे क्रमांक नाव येत आहे ते म्हणजे संदीप काळे हे माजी नगरसेवक, सभापती राहिलेले असून ते शालेय जीवनात प्रभात शाखेत जाणारे स्वयंसेवक व नंतर बजरंग दलाचे शेगाव संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडणारे व भाजपमध्ये मागील काही वर्षापासून सक्रिय भाजपचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून सर्व समावेशक असल्याचे त्यांना हे पद मिळेल काय? की पक्ष अजून काही नवीन चेहरा समोर आणतेकि काय अशी जोरदार चर्चा आहे. आता हा अध्यक्षपदाचा चेंडु आता लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या कोर्टात गेल्याची जोरदार चर्चा आहे. या नावांपैकी अशा चढा ओळीत शहराध्यक्ष पदा कोणाची नियुक्ती होईल व ते लवकर व्हावी याकडे सर्व कार्यकर्त्यांचे व शहरवासी यांची लक्ष लागले आहे एवढे मात्र नक्की शेवटी पक्ष ज्याला जे जबाबदारी देईल तो ते पार पाडेल असे एकंदरीत मतप्रवाह सुरू आहे.