अमरावती :-
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 ची कलम 73 क (अ) अंतर्गत कारवाई
अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. सहकार विभागाच्या विभागीय सहनिबंधकांनी हा निर्णय दिला असून, न्यायालयाने सुनावलेल्या एका वर्षाच्या शिक्षेचा आधार घेत ही कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.






