राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी अंकुश घारड यांची निवड ; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते स्वीकारले नियुक्ती पत्र !

 

मोर्शी  : मोर्शी येथील अंकुश घारड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या अमरावती जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मोर्शी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश घारड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे , युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार देवेंद्र भुयार, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, विदर्भ अध्यक्ष निखिल ठाकरे यांनी निवड केली, अंकुश घारड यांची सुरवात मोर्शी शहराध्यक्ष म्हणून झाली आणि आता अमरावती जिल्हाध्यक्ष पद हे त्यांना पक्षाने कामाची दखल घेऊन दिले आहे.
मोर्शी तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला अमरावती जिल्हा अध्यक्ष पदाची एवढी मोठी जबाबदारी अंकुश घारड यांना मिळाल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.
प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केल्यावर त्याचे फळ नक्की मिळते यावर आपला विश्वास असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सर्व नेत्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवुन पार पाडणार असल्याचे अंकुश घारड यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवून युवकांना न्याय मिळवून देणारे, प्रचंड संघर्षातून उभे राहून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर नेतृत्व सिद्ध करणारे अंकुश घारड यांना महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यानी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकुश घारड यांची काम करण्याची जिद्द आणि चिकाटी पाहिली की राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक मजबूत युनिट उभे राहून राष्ट्रवादी पक्ष उंच भरारी घेईल असा विश्वास सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केला जात असून यांच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.