अमरावती ब्रेकिंग- : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या …!

अमरावती : शहरात गुन्हेगारीला आळा बसावा याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या पोलिस अधिकाऱ्याचा निर्घृण खून झाल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे. वलगाव पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर कार्यरत असलेले अब्दुल कलाम अब्दुल नबी (वय 57,  टीचर कॉलनी, अमरावती) यांची शनिवारी संध्याकाळी आधी अपघात घडवून आणला नंतर सहा ते सात अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या नवसारी टी पॉईंटजवळ शनिवारी (ता. २८) संध्याकाळी हा थरकाप उडवणारा प्रकार घडला. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देऊन तपशील जाणून घेतला. आरोपींच्या मागावर वेगवेगळ्या पथकांना रवाना करण्यात आले आहे. तर आता आलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एक ने अवघ्या सहा तासात आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी  उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल असल्याचे वृत्त आहे.